"अरे बाबा ! तुम्ही आज बाहेर गेला होतात ना? मग बाहेर खाल्ले का तुम्ही ?"🧐 आर्य ने बाबांना विचारले. "अरे हो रे, आम्हाला माहीत नव्हते आम्हाला खूप वेळ लागणार आहे. मग भूक लागल्यावर आम्हाला खावेच लागले" 🤐😒
"पण बाबा आपले ठरले होते ना?😱 काही बाहेरचे खायचे नाही म्हणून? आपला सौजन्य सप्ताह चालू आहे ना." 😳 आर्याचा पुन्हा प्रश्न. "तरी आम्ही भाजी पोळी असे साधेच जेवण घेतले रे बाहेर. मग पाळला ना आम्ही सौजन्य सप्ताह ? " इति बाबा 🤔
सौजन्य सप्ताह म्हणजे या दिवसात केवळ घरातीलच पदार्थ खायचे. भाजी पोळी वरण भात अश्याप्रकारचे पथ्यकर अन्नच घ्यायचे. बाहेरील पदार्थ, बेकरी प्रोडक्टस घ्यायचे नाहीत. घरातही खूप गोड अथवा अतिशय तिखट, तेलकट पदार्थ टाळायचे. आर्य आणि त्याच्या घरातील सर्व मंडळींनी असा "सौजन्य सप्ताह" पाळायचे ठरवले होते. 🙂🙂आयुर्वेदाची तत्वे घरात अशी रुजू शकतात.
आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण येतात. त्या सणांमध्ये वेगवेगळ्या रसांचे विविध पदार्थ सतत बनवले जातात. त्याच्या जोडीलाच सध्याच्या नवीन पिढीबरोबर राहण्यासाठी सतत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. अशा वेळी कधी गोड पदार्थ, कधी चटपटीत काहीतरी पदार्थ बनवावे लागतात. कधी त्यांना खुश ठेवण्यासाठी काही पदार्थ घरात आणावेच लागतात. अनेकवेळा घरी मान्य नसले तरी बाहेरील मुलांचे वागणे, खाणे पिणे पाहून काही गोष्टींसाठी हट्ट धरला जातो. काहीवेळेस समजावूनही त्यांना पटत नाही, अथवा कधी कधी त्यासाठी त्यांची चिडचिड होते. कधी हट्टाने ते पाहिजे ते मागूनच घेतात.
आपल्या शरीरासाठी काय योग्य आणि काय नाही हे मुलांना लक्षात येत नाही. अगदी लहान मुले तर केवळ आपले मित्र मैत्रीण खात आहेत म्हणून मला हवे असा हट्ट 😭😆करत राहतात. सध्या जाहिरातींच्या चुकीच्या भडीमाराने पदार्थांची खरी nutritional value 🍟🍕🍜🍔पालकांनाही कळत नाही. त्यामुळे नको ते खाणे मुलांच्या ताटात सतत येत असते. अशावेळी मुलांना कसे समजवावे हे समजत नाही.
पुढे कधीतरी काही आजार निर्माण झाल्यावर त्यावरील पथ्यपालन मुलांसाठी जड होते. त्यामुळे इतर मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
परंतु, ही वेळ येऊ नये यासाठी पालकांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे.
तसे न केल्यास मुलांमध्ये स्थूलता वाढणे🙇, लवकर चष्मा लागणे🧑🏫, लवकर केस पांढरे होणे🧓 वा गळणे या तक्रारी वाढतात. उंची न वाढणे, शरीर दुबळे असणे😩 अथवा शरीरयष्टी चांगली असूनही थकवा येत राहणे, इ तक्रारी राहतात.🤒🤕
यामागील कारणांचा आणि त्यावरील उपाय यांचा विचार करूयात.
१. मुले नेहमी अनुकरणशील असतात. आपले आई बाबा काय, कसे आणि किती खातात ह्यावर त्यांचे सतत लक्ष असते. त्यामुळे पालकांनी आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष ठेवायला हवे. ज्या गोष्टी मुलांनी अनुकरण करायला नको आहेत त्या गोष्टी त्यांच्या समोर तरी टाळाव्यात.
२. बाहेरून घरात आणल्या जाणाऱ्या पदार्थांवर nutritional value छापलेली असते. ती मूल्ये भारतीय व्यक्तींसाठी आहेत का? किंवा ती खरोखरच माझ्या घरातील व्यक्तींसाठी उपयोगी आहेत का याचा विचार केला जात नाही. घरात सतत आणल्या जाणाऱ्या बाहेरील बेकरीच्या आणि इतर पदार्थांकडे, ते पदार्थ अतिशय चटपटीत असल्याने मुलांना त्यांचे जास्त आकर्षण असते. ते पदार्थ किती प्रमाणात खाल्ले जावेत याचे महत्व मुलांना समजवायला हवे, तसेच त्यांच्यासाठी असणाऱ्या जाहिरातीतील फोलपणा मुलांना समजावून सांगितला तर मुले त्यासाठी हट्ट करत नाहीत.
३. घरातही बटर, चीज व पनीर वापरून जे पदार्थ केले जातात ते चवीष्ट लागल्याने प्रमाणाबाहेर खाल्ले जातात. त्यामुळे ते शरीरात योग्य तसे पचत नाहीत.
४. एकावर एक अतिशय गोड, तिखट, आंबट इ पदार्थांचे सातत्याने आणि भूक नसताना सेवन केल्यास असे पदार्थ शरीराला त्रास देतात. हे पदार्थ अथवा अशाप्रकारचे खाणे शरीरात रोग उत्पन्न करतात हे मुलांना समजावणे आवश्यक असते.
५. मुलांचे हट्ट😖 कधी सहन न झाल्याने अथवा काहीवेळेस मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीचे चॉकलेट, गोळ्या, चिप्स असे पदार्थ मुलांना आणून दिले जातात, असे करणे टाळावे.
६. सतत बाहेरचे खाणे घेतल्याने मुलांचे घरात बनवल्या जाणाऱ्या पदर्थांवरून मन उडते. त्यामुळे घरात बनवले जाणाऱ्या पदार्थांचे महत्व, त्यामागील मेहनतही काही वेळेस मुलांना समजवावी लागते.
७. मुलांची मानसिक अवस्था लक्षात घेणेही आवश्यक आहे.
८. वेगवेगळ्या रसांची (६रस) सवय मुलांना लहानपणापासून लावल्यास त्यांचे taste buds योग्य काम करायला लागतात. पुढे मुले कोणत्याही पदार्थाला नाक मुरडत नाहीत.
अशी अनेक कारणे मुलांना सतत होणाऱ्या रोगांची असू शकतात. त्यामुळे त्यासाठी पालकांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठीच अशा "सौजन्य सप्ताह" सारख्या ideas त्यांना देत राहाव्यात.
Let's be assured that you have a Real Life Insurance Policy with us - SSM Ayurveda Healthy and Pleasant life through Ayurveda.
Follow us
ssmayurveda@instagram
ssmayurveda@twitter
ssmayurveda@youtube
Our website
www.ssmayurveda.com
For more updates, join our telegram group - https://t.me/joinchat/Fknelt9VC-YcAXg4
Comentarios