top of page
Search
Writer's pictureSSM Ayurveda

आयुर्वेदशास्त्र आणि स्पेशालिटी (Ayurveda & Speciality)

Updated: Feb 21, 2023


@ssmayurveda @vdmeghanabakre

आजकाल लोकांना स्पेशालिस्ट/सुपर स्पेशालिटीची इतकी सवय झाली आहे की, आयुर्वेदाकडे येणारा रुग्णही माझे विशिष्ट शरीर भागात होणाऱ्या दुखण्यावर आयुर्वेदामध्ये उपाय आहे का नाही असा विचार करतो. अनेक रुग्ण विचारतात आयुर्वेदामध्ये स्पेशालिटी आहे का? त्यावर उत्तर “नाही” असेच आहे.

खरेतर, संधिवात, आमवात यांसारख्या रोगांवर आयुर्वेदामध्ये खात्रीशीर उपाय आहे. परंतु, रुग्ण तरीही स्पेशालिटीचा विचार करतात. आयुर्वेदात पथ्य पाळावे लागते म्हणून रुग्ण आयुर्वेदापासनू दूर पळतात. पण, खरे सांगायचे तर जर पथ्य पाळले गेले नाही तर conventional medicine मध्येही तात्कालिक लक्षणे कमी करण्याशिवाय उपाय नाहीत हे आपण जाणतो. लक्षणे कमी होणे वा बदं होणे म्हणजे रोग बरा झाला हा विचार चुकीचा आहे हे येथे प्रथम समजनू घेणे आवश्यक आहे.

शरीरात वाढलेले दोष पथ्य पाळून आणि शमन(दोष कमी करणारी) औषधे घेऊन अथवा त्या दोषांना शरीराबाहेर काढून (शोधन/पचंकर्म करून) पूर्णपणे बरे होतात. केवळ तात्कालिक औषधांमुळे लक्षणे कमी झाली तरी शरीरात वाढलेले दोष कमी होत नसतात. असे केल्यास दीर्घकालीन रोग उत्पन्न होतात आणि आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात आणि आयुष्यभर पथ्य करावे लागते. त्या औषधांच्या side effects नी इतर व्याधीही निर्माण होतात. याचे कारण औषधाची स्वतः ची विषक्तता आणि शरीरात कायम टिकून राहिलेले दोष हे असते.

जसे शरीरात वाढलेले दोष योग्य वेळात कमी न करता दाबले गेले तर उच्च रक्तदाब, Diabetes अथवा त्वचारोगासारखे रोग आयुष्यभर त्रास देतात.

रोगांना वेळीच त्यातील दोष कमी करून पूर्णपणे आळा घातला तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.

आयुर्वेदशास्त्र स्पेशालिटीचा विचार करू शकत नाही. कारण, आयुर्वेदशास्त्र संपूर्ण शरीराचा एकाचवेळी विचार करते. शरीरात वाढलेले दोष हे शरीरातील विविध भागांवर काम करततात. उदा. शरीरात जेव्हा वात वाढतो तेव्हा तो संधिवात निर्माण करत असताना तो ह्रदयप्रदेशी ही दुष्टी करतो अथवा योनीप्रदेशावरही अथवा इतर भागातही. मग केवळ जे लक्षण निर्माण झाले आहे त्यावर उपाय केला तर तो वात तेथील लक्षण कमी करेल पण इतरत्र आपले बिघडलेले कार्य चालू ठेवणार. असे असताना केवळ एका अवयवाची चिकित्सा कशी करता येईल. तो शरीरात वाढलेला दोष पूर्णपणे कमी होण्यासाठीच आयुर्वेदशास्त्र शरीराचा सर्वांगीण विचार करते.

अनेक रुग्ण आम्हाला सांगतात की, पोट बिघडलेले असताना तुम्ही दिलेल्या औषधांनी माझी सांधेदुखी कमी झाली. हा आयुर्वेदातील सर्वांगीण विचाराचा परिणाम आहे. त्यामुळेच आयुर्वेद शास्त्रामध्ये स्पेशालिटीची आवश्यकता नाही. @ssmayurveda @vdmeghanabakre


Let's be assured that you have a Real Life Insurance Policy with us - SSM Ayurveda Healthy and Pleasant life through Ayurveda.


Follow us

ssmayurveda@instagram

ssmayurveda@twitter

ssmayurveda@youtube


Our website

www.ssmayurveda.com


For more updates, join our telegram group - https://t.me/joinchat/Fknelt9VC-YcAXg4


#ayurveda #ayurvedaspeciality

28 views0 comments

Recent Posts

See All

# आयुर्वेदाच्या नजरेतून……✍️… *वैद्य मेघना बाक्रे*

नवरात्री…भाग १ (अश्विन मासारंभ - अश्विन शुद्ध प्रतिपदा) आदिमाया शक्ती, देवी दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली या साऱ्या स्त्रीतत्वांचे...

Comments


Post: Blog2_Post
bottom of page